बेळगाव : येथील ज्योती सेंट्रल स्कूल मध्ये दहावीत शिकणाऱ्या सिद्धार्थ भरत अधिकारी या युवा क्रिकेटपटूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याची निवड कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट (KSCA) सोळा वर्षांखालील उत्तर कर्नाटक, धारवाड विभाग संघात झाली आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सिद्धार्थने क्रिकेटमध्ये दाखवलेले कठोर परिश्रम आणि सातत्याने केलेली उच्च दर्जाची कामगिरी यामुळेच ही निवड शक्य झाली आहे.
या युवा खेळाडूच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी ज्योती सेंट्रल स्कूलच्या व्यवस्थापनाने त्याचा गौरव केला. यावेळी शाळेचे एस.एम.सी. कमिटीचे चेअरमन ज्येष्ठ निवृत्त प्राचार्य आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रोफेसर आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रोफेसर नितीन घोरपडे तसेच शाळेच्या ॲडव्हायझरी डायरेक्टर श्रीमती. मायादेवी अगसगेकर आणि मुख्याध्यापिका श्रीमती. सोनाली कंग्राळकर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी सिद्धार्थला त्याच्या आगामी क्रिकेट प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.