विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकारांना जिल्हास्तरीय वार्षिक पुरस्कार, पत्रकारांच्या मुलांना प्रतिभा पुरस्कार, पत्रकार दिन आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींना सन्मान समारंभ दि.१९ जुलै रोजी शनिवारी सकाळी १० वाजता विजयपूर शहरातील कंदगल श्री हनुमंतराय रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रकाश बेण्णूर यांनी दिली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी आणि संघाच्या सर्व सदस्यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रिका भवन (जिल्हा पंचायत रोड) येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना ते म्हणाले की, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एस.एस.एल.सी. व पीयूसी परीक्षांमध्ये उच्च गुण प्राप्त केलेल्या पत्रकारांच्या मुला-मुलींना प्रतिभा पुरस्कार दिला जाणार आहे. याचबरोबर जिल्ह्याच्या वरिष्ठ पत्रकारांना वार्षिक पुरस्कार, विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींना सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री एम.बी. पाटील, हावेरीचे पालकमंत्री शिवानंद पाटील, खासदार रामेश जिगजिणगी, आमदार बसनगौडा पाटील (यत्नाळ), मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के.व्ही. प्रभाकर, केयूडब्ल्यूजे चे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूर, प्रमुख सचिव जी. लोकेश, उपाध्यक्ष पुंडलिक बालोजी, भवानीसिंह ठाकूर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. विशेष व्याख्यान म्हणून ज्येष्ठ पत्रकार गोपाळ नायक यांचे व्याख्यान होणार आहे.
- विशेष सन्मान प्राप्त मान्यवर :
- जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी
- जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुषी आनंद
- डीवायएसपी बसवराज एळिगार
- ग्रामीण पत्रकारांना मोफत बस पास वितरणासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर व केयूडब्ल्यूजे अध्यक्ष शिवानंद तगडूर यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
- जिल्हास्तरीय वार्षिक पुरस्कार विजेतांचे नावे :
- श्रीमती सरोजिनी कुलकर्णी (कन्नड कोगिले – महिला विभाग)
- परशुराम शिवशरण (होसदिगंत)
- नवीन अंजुम ममदापूर (संयुक्त कर्नाटक)
- विनोद सारवाड (रणरंग)
- शरणबसप्पा मसळी (करणाडु प्रभा)
- अप्पू चिनगुंडी (सुवर्ण टीव्ही – कॅमेरा मॅन)
- गुरप्पा लोकुरी (विजयवाणी)
- मल्लिकार्जुन अल्लापूर (विश्ववाणी – सिंदगी)
- मंजू कलाल (विश्ववाणी – बसवणबागेवाडी)
- मल्लिकार्जुन कुबकड्डी (कन्नड प्रभ – कोल्हार)
- बसलिंगय्या मठपती (होसदिगंत – निडगुंडी)
- बीरप्पा होसूर (रविवाणी – इंडी)
- गुरु हिरेमठ (विजय कर्नाटक – आलमेल)
- श्रीमती लक्ष्मी हिरेमठ (संयुक्त कर्नाटक – तिकोटा)
- मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी (कन्नड प्रभ – देवरहिप्परगी)
- शिवय्या मटपती (उदयवाणी – चडचण)
- नूर नबी नदाफ (गुम्मटनगर – मुद्धेबिहाळ)
- शिवानंद सज्जन (विजयकर्नाटक – तालीकोट)
याशिवाय, एस.एस.एल.सी. व पी.यू.सी. परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या १७ विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या बैठकीस जिल्हा कार्यकारी समितीचे सचिव मोहन कुलकर्णी, उपाध्यक्ष इंदूशेखर मण्णूर, राष्ट्रीय मंडळाचे महेश शेट्टीगार, राज्य कार्यकारी समिती सदस्य डी.बी. वडवडगी, कौशल्या पनाळकर, के.के. कुलकर्णी, खजिनदार राहुल आपटे, अशोक यडहळी, गुरु गद्दनकेरी, बसवराज उल्लागड्डी, इर्फान शेख, शशिकांत मेंडेगार, शरणू मसोळी, गुरु लोकुरी, मल्लू केंभावी, नागेश नागूर, महमद समीर इनामदार आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते.