• भक्तांकडून चांगभलंचा गजर आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण

कोल्हापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री क्षेत्र बाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर बुधवारी, १ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा पार पडली. बेळगावसह महाराष्ट्रभरातून सासन काठ्या, नगारा आणि बैलगाड्या वाजत-गाजत जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या.

बेळगाव येथील चव्हाट गल्ली आणि नार्वेकर गल्लीतील सासनकाठ्यानंदी, निगवे दुमाला मार्गे श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात दर्शन घेऊन, दक्षिण दरवाजा मार्गाने जोतिबा मंदिराच्या आवारात दाखल झाल्या. परंपरेनुसार ग्रामस्थांनी भाविकांचे स्वागत केले आणि भक्तांनी पाच प्रदक्षिणा काढून देवाचे दर्शन घेतले. यावेळी भक्तांनी चांगभलंचा गजर करत, गुलाल खोबऱ्याची उधळण करून मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय केले.