बेळगाव : मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमानुसार शाळा प्रारंभॊत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आधार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल याची ग्वाही दिली.

तसेच संचालक डॉ. रोहित बामणे, डॉ. अभिषेक बामणे, रवी जोशी, डॉ. अरुण जाधव हे मान्यवर देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नूतन विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. रोपाला पाणी देऊन सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्षाचा कार्यारंभ करण्यात आला. प्राचार्या आर. आर. जोशी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. राजेश्वरी तरबर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा मलकन्नवर यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी शाळेच्या शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.