बेळगाव / प्रतिनिधी
मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ब्रह्माकुमारी अनिता यांनी उपस्थित राहून गुरुचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. गुरुचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असून सर्वांनी गुरूंचा आदर नेहमी राखावा असे त्यांनी सांगितले. शाळेच्या प्राचार्या आर.आर.जोशी आणि अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला त्यांना शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले. प्रमुख अतिथी परिचय समीक्षा पाटील यांनी करून दिला तर शिवम ठाकूर याने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिषा हिने केले.