बेळगाव / प्रतिनिधी
मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधव प्रभू उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर डॉ. माधव प्रभू यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि स्वागत गीताने झाली. प्रमुख पाहुणे डॉ. माधव प्रभू यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे चेअरमन रवी जोशी यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त केले. वार्षिक अहवाल वाचन प्राचार्या आर. आर.जोशी यांनी केले. बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन रेखा मलकन्नवर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीची विद्यार्थिनी प्रिया मंडोळकर हिने केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन दहावीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. आभार प्रदर्शन विनायक शर्मा आणि राजेश्वरी तरबर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.








