बेळगाव / प्रतिनिधी

मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमन इफेक्ट’ या शोध लावल्याच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विज्ञान प्रकल्पांची मांडणी केली होती. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विविध प्रयोग सादर करण्यात आले होते. छोट्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांच्या संदर्भात माहिती देऊन उपस्थितांची मने जिंकली.

मुख्याध्यापिका आर आर जोशी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी वर्गाला शुभम परालशेट्टर, पुष्पा शेखर, विद्याश्री बुलबुले,श्रुती तुरमुरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम संयोजनासाठी समस्त शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.