बेळगाव / प्रतिनिधी

मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल मध्ये रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व मुलांनी उत्साहाने भाग घेतला आणि आकर्षक राख्या बनवल्या. त्यांना तज्ञ कला प्रशिक्षक बिना तलाठी, मनाली कुलकर्णी आणि मनीषा हरिदास यांनी मौलिक मार्गदर्शन केले. शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मुलांना मदत केली. शाळेच्या प्राचार्य आर. आर. जोशी, अरुण जाधव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रशिक्षकांना गौरविण्यात आले.