- नवे तांत्रिक पाऊल
येळ्ळूर : आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून जय भारत फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेला तब्बल १० संगणकांची देणगी प्रदान करण्यात आली. डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमात येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य श्री. सतिश बाळकृष्ण पाटील तसेच महेश मल्लाप्पा चौगुले, आनंदवाडी शहापूर यांनी विशेष प्रयत्न करून ही देणगी शाळेपर्यंत पोहोचवली. आधुनिक शैक्षणिक साधनांची उपलब्धता वाढविण्यासाठी त्यांचे हे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या कार्यक्रमाला ज्योतिबा उडकेकर (एसडीएमसी उपाध्यक्ष) हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. यावेळी जयभारत फाउंडेशनचे बसवणगौडा पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.








