बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे मंगळवार दि. ३ मार्च २०२६ रोजी गौर पौर्णिमा महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर टिळकवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कीर्तन त्यानंतर अभिषेक आणि इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर सर्वांसाठी महाआरती व महाप्रसाद होणार आहे याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.