- मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची उपस्थिती
विजयपूर / दिपक शिंत्रे
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे उद्या १४ जुलै रोजी विजयपूर जिल्ह्याचा दौरा करणार असून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्या दिवशी दुपारी १२:०५ वाजता सोलापूर विमानतळावरून मार्गाने निघून, दुपारी १२:५० वाजता विजयपूर जिल्ह्यातील इंडी येथे पोहोचणार आहेत. तेथे ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर भव्य व्यापारी संकुलाचे उद्घाटन करतील तसेच शक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ५०० कोटींच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याबद्दल केकेआरटीसी बसची पूजा करतील. दुपारी १:१५ वाजता इंडी पोलीस परेड मैदानात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित इंडी विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय विभागांच्या कामांची पायाभरणी व लोकार्पण तसेच लिंबू विकास मंडळाच्या प्रतीकेचे (लोगोचे) प्रकाशन सोहळ्यात सहभागी होतील. सायंकाळी ४:३० वाजता इंडी येथून सोलापूर मार्गे परत बंगळुरूला प्रयाण करतील, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.