• माजी आमदार एम. जी. मुळे यांचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

बसवकल्याणचे माजी आमदार व मराठा समाजाचे नेते एम.जी. मुळे यांनी जनगणना सर्वेक्षणाच्या वेळी माहिती नोंदवताना जात रकान्यात प्रथम ‘हिंदू मराठा’ आणि त्यानंतरच पोटजातीचा उल्लेख करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार जातीनिहाय जनगणना करत आहे. या सर्वेक्षणाच्या फॉर्ममध्ये धर्म – हिंदू, जात – मराठा, पोटजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी असा तपशील भरावा, असा निर्णय ११ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या विस्तृत बैठकीत घेण्यात आला आहे.

मुळे यांनी स्पष्ट केले की, मराठा समाज प्रामुख्याने शेतकरी व मध्यमवर्गीय असून, पोटजातींची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्वभूमी वेगळी असली तरी जात रकान्यात नेहमी ‘हिंदू मराठा’ असे लिहावे आणि त्यानंतर पोटजातीची नोंद करावी. या निर्णयाबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचे काम केले जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव, तसेच क्षत्रिय मराठा नेते ॲड. अनिल बेनके उपस्थित होते.