हुक्केरी / वार्ताहर
हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर गावात बुधवारी रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महंतेश बुकानट्टी (२४) असे या तरुणाचे नाव आहे.या घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
सदर तरुण बुधवारी रात्री बसमधून उतरून आपल्या घरी जात होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. त्याचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते आणि हेच या हत्येचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.