हुबळी : प्रवाशांच्या सोयीसाठी नैऋत्य रेल्वेने नवा निर्णय घेतला आहे. उद्या सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून १७३१७/१७३१८ एसएसएस हुबळी – दादर -एसएसएस हुबळी एक्स्प्रेस गाड्यांना खानापूर स्थानकावर एक मिनिट थांबण्याची सुविधा दिली जाणार आहे.
१७३१७ (एसएसएस हुबळी–दादर) ही गाडी संध्याकाळी ५:५९ वाजता खानापूर येथे पोहोचून ६:०० वाजता पुढे निघेल. तर १६ सप्टेंबर २०२५ रोजी, १७३१८ (दादर–एसएसएस हुबळी) सकाळी ८:४० वाजता खानापूरला येईल व ८:४१ वाजता सुटेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या नव्या थांब्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वे राज्यमंत्री बेळगाव, अनगोळ आणि खानापूर येथे विविध विकासकामांची पायाभरणी करतील. त्यानंतर खानापूर रेल्वे फाटकाच्या मार्गाचे भूमिपूजन झाल्यावर ते या थांब्याचा औपचारिक शुभारंभ आणि हुबळी – दादर – हुबळी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून पुढे रवाना करतील.