- चंद्रग्रहणामुळे वेळेत बदल
बेळगाव : यंदा होळीचा सण सोमवार दि. २ मार्च रोजी तर रंगपंचमी मंगळवार दि. ३ मार्च रोजी साजरी होणार आहे. चव्हाट गल्ली येथे होळी सणानिमित्त किल्ला परिसरातून माडाचे झाड आणण्याचा पारंपरिक कार्यक्रम सोमवार सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे होळीला अग्नी देण्याचा विधी दुपारी ३ वाजण्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६.४५ या ग्रहणकाळात सर्व धार्मिक व इतर कार्यक्रम स्थगित राहतील. ग्रहणानंतर सायंकाळी ७ वाजल्यानंतर श्री चव्हाटा देवस्थान येथे यात्रेनिमित्त पूजा विधी होणार आहे. सर्व भक्तांनी व बेळगावकरांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन पंच कमिटी, चव्हाट गल्ली यांच्यावतीने करण्यात आले आहे.








