बेळगाव / प्रतिनिधी
होळी – रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मद्यविक्रीवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे.
अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सोमवार, २ मार्च रोजी दुपारी २ वाजल्यापासून मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत शहरातील सर्व दारू दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये मद्यविक्री व मद्यपान पूर्णतः बंद राहणार आहे.
सदर आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अबकारी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.








