बेळगाव : जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने आणि रामानंद संप्रदाय, जिल्हा बेळगाव शहर यांच्यावतीने नववर्षाच्या प्रारंभी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बेळगाव शहरातील बस्तवाड आरती केंद्र येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.

ही मिरवणूक मेन रोड – संभाजी गल्ली – राजदीप कार्यालय पासून सुरू होऊन गणपती मंदिर येथे सांगता करण्यात आली. मिरवणुकीत कुद्रेमानी, वडगाव, येळ्ळूर, पिरणवाडी, सांबरा, बामणवाडी, धामणे, खानापूर, नंदगड, आणि मजगाव सेवा केंद्र यांचे भक्तगण विशेष रूपात देखावे सादर करत सहभागी झाले.

यावेळी संप्रदायाच्या वतीने देहदान, अवयव दान आणि इतर सामाजिक सेवा यांचा संदेशही मिरवणुकीतून दिला गेला. शेकडो संप्रदायिक भक्त उपस्थित होते. कोणत्याही गोंधळाशिवाय मिरवणूक यशस्वीरीत्या पार पडली. यासाठी संप्रदायातील संग्राम सैनिक आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य केले. ही माहिती रोहित पाटील यांनी दिली.