बेळगाव : येथील केएलएस गोगटे कॉमर्स आणि सायन्स पीयू कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत ६०० पैकी ५९९ गुण मिळवत कॉमर्स विभागात बेळगाव जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
ध्वनी कुलकर्णी हिने इंग्रजी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवले, तर संस्कृत, बिझनेस स्टडीज, अकाउंटन्सी, स्टॅटेस्टिक्स आणि बेसिक गणित या पाच विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. गोगटे कॉलेजचे प्राचार्या ,प्राध्यापक तसेच तिच्या आई-वडिलांचे तिला मार्गदर्शन लाभले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
April 9, 2026
चोरीच्या सात दुचाकी जप्त धारवाड : धारवाड शहर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून ७ दुचाकी जप्त […]








