बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त काल व आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काल रात्री वारकरी संप्रदाय भजनी मंडळाचे भजन झाले. आज पहाटे हनुमान मूर्तीवर शेकडो भक्तांचे अभिषेक झाल्यानंतर पहाटे ५ वाजल्यापासून ह. भ. प. श्री कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे हनुमान जन्मोत्सवावर प्रवचन झाले. ठीक 6 वाजून 25 मिनिटांनी हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा अनेक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर महिलांच्या भजनाचे कार्यक्रम झाले. घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दुपारी महाप्रसाद होणार आहे.
October 25, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या कन्नड ध्वजावरून निर्माण झालेल्या वादाच्या प्रकरणात, कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकवून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी […]








