सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव तालुक्यातील गणेशपूर – बेळगुंदी मार्गावर आज शुक्रवारी सकाळी बेळगावहून बेळगुंदीच्या दिशेने जात असलेल्या परिवहन बसचा उचगाव क्रॉसजवळ अपघात झाला. स्टेअरिंग तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

या घटनेत दोन शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी जाळे असून इतर प्रवाशांना सौम्य दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे . अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. सदर अपघातात बसच्या दर्शनी भागाचे पूर्णपणे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुणालयात हलवले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट पाहणी करून पुढील कारवाई सुरु केली आहे.