- मातोश्री सौहार्द सोसायटी – केएलई हॉस्पिटल नेहरूनगर यांच्या सहकार्याने आयोजन
मण्णूर : येथील मातोश्री सौहार्द सोसायटी आणि केएलई हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी मातोश्री सोसायटी गोजगे रोड, मण्णूर येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. या शिबीरात रक्तदाब व मधुमेह चाचणी होणार आहे. तर नेत्र तपासणीवेळी मोतीबिंदू आढळल्यास डोळ्यांचे ऑपरेशनही मोफत करून दिले जाणार आहे.
तरी इच्छुकांनी या शिबीराचा लाभ घेण्याकरिता, आर. एम. चौगुले ९४४८४८७५९५ (चेअरमन), सागर कटगेन्नावर ९८४४३८१९९६ (व्हा. चेअरमन), सोसायटी व्यवस्थापक ८१४७०२८३२३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
