बेळगाव : हॉकी नेहमीच भारतीय लोकांचा आहे आणि हा उत्सव प्रत्येक चाहत्यासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येकासाठी आहे. असे उदगार उद्घाटक बसवेश्वर बँकेच्या माजी चेअरमन शैलजा जयप्रकाश भिंगे यांनी काढले.

हॉकी इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त हॉकी बेळगावने लेले मैदानावर आयोजित केलेल्या चौथ्या हॉकी बेळगाव निमंत्रित कप स्पर्धेचा आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेचे अमोदराज स्पोर्ट्सने प्रायोजकत्व केले आहे.

यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, सचिव सुधाकर चाळके, क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, अमोदराज स्पोर्ट्सचे मुकुंद पुरोहित, चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी दत्तात्रय जाधव, प्रशिक्षक उत्तम शिंदे, मनोहर पाटील नामदेव सावंत, खानापूरचे प्रशिक्षक गणपत गावडे, आशा होसमनी, डॉ. गिरीजाशंकर माने, सिद्धार्थ चाळके, विकास कलघटगी आदी उपस्थित होते. यावेळी अमोदराज भिंगे यांचा 48 वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

बेळगाव शहरातील सात महाविद्यालयीन संघानी सहभाग घेतला असून गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, आरपीडी महाविद्यालय, जीएसएस महाविद्यालय, पीपल ट्री महाविद्यालय संगोळी रायण्णा महाविद्यालय यांचा मुलांचा तर जीएसएस, आरपीडी व संगोळी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने भाग घेतला आहे.