- शेतकऱ्यांचा आरोप
बेळगाव / प्रतिनिधी
हिडकल जलाशयातून एकाचवेळी जास्तीचे पाणी सोडल्यामुळे घटप्रभा नदीपात्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, मोठा पाऊस पडत नसला तरी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली आहे. गोकाकसह घटप्रभा नदीपात्रातील विविध गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.