- तिघांचा मृत्यू ; एक जखमी
- बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरु
शिरोडा / वार्ताहर
शिरोडा-वेळागर समुद्रात संध्याकाळी ४.४५ वाजता ८ पर्यटक बुडाले. त्यापैकी ४ जणांना वाचवण्यात आले; मात्र ३ जण मयत झाले आणि १ महिला गंभीर अवस्थेत शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील खानापूर, लोंढा आणि अळणावर येथील आठ जण वेळागर समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. या दुर्घटनेतील आठ जणांपैकी एका पर्यटकाला वाचवण्यात यश आले आहे.
मृत पर्यटकांमध्ये फरहान इरफान कित्तूर (वय ३४), इबाद इरफान कित्तूर (वय १३) आणि नमीरा आफताब अख्तर (वय १६) यांचा समावेश आहे. इसरा इम्रान कित्तूर (वय १७) वाचला आहे. बेपत्ता पर्यटकांमध्ये इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६), इक्वान इमरान कित्तूर (वय १५), फरहान मोहम्मद मणियार (वय २०) आणि जाकीर निसार मणियार (वय २३) यांचा समावेश आहे.
- मृत आणि जखमी पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे :
- फरहान इरफान कित्तूर (३४) – मयत
- इबाद इरफान कित्तूर (१३) – मयत
- नमीरा आफताब अख्तर (१६) – मयत
- इसरा इम्रान कित्तूर (१७) – वाचले
- बेपत्ता पर्यटक :
- इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६)
- इक्वान इमरान कित्तूर (१५)
- फरहान मोहम्मद मणियार (२०)
- जाकीर निसार मणियार (२३)
घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाच्या यंत्रणा सक्रिय असून, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.