बेळगाव : केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे त्यांनी आपल्या जवळील १९३४ मॉडेलची फोर्ड सलून कार मराठा लाईट इन्फंट्रीला हस्तांतरित केली. आपल्या वडिलांच्या आठवणीसाठी त्यांनी आजही ती कार जपून ठेवली होती. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्याकडे त्यांनी ती कार सोपविली. मराठा लाईट इन्फंट्रीच्या संग्रहालयात आता तिचा समावेश होणार आहे.