बेळगाव / प्रतिनिधी
दीपावली सणादरम्यान प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने म्हैसूर–जयपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला बेळगावसह महाराष्ट्र व गुजरातमधील प्रमुख स्थानकांवर थांबा असेल.
गाडी क्रमांक ०६२३१ म्हैसूर–जयपूर एक्सप्रेस स्पेशल ही विशेष गाडी १८ व २५ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हैसूरहून रात्री ११:५५ वाजता सुटेल आणि सोमवारी सायं. ६:४० वाजता जयपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०६२३२ जयपूर–म्हैसूर एक्सप्रेस स्पेशल परतीच्या दिशेने ही गाडी २१ व २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जयपूरहून पहाटे ४:०० वाजता सुटेल व गुरुवारी पहाटे ३:३० वाजता म्हैसूरला पोहोचेल.
प्रमुख थांबे: मंड्या, केएसआर बेंगळुरू, तुमकुरू, अर्सिकेरे, कदूर, दावणगेरे, हुबळी, धारवाड, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सातारा, पुणे, कल्याण, वसई रोड, वलसाड, सुरत, अहमदाबाद, बडोदा, मारवाड, अजमेर आणि किशनगड आदी ठिकाणांचा समावेश आहे.
मात्र, या सेवेदरम्यान गाडी क्रमांक ०६२३१ जयपूरकडे जाताना साबरमती बीजी थांबा वगळेल, तर गाडी क्रमांक ०६२३२ म्हैसूरकडे परतताना अहमदाबाद थांबा वगळला जाईल.या विशेष गाडीमध्ये २ एसी टू-टायर, १२ एसी थ्री-टायर, २ स्लीपर क्लास तसेच २ लगेज-कम-ब्रेक व्हॅनसह एकूण १८ डबे असतील.