मुंबई : अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. अशातच त्यांच्या निधनाच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. अशातच सतत देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स शेअर केले जात आहेत. अशातच आता पुन्हा एकदा धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन धर्मेंद्र यांचे निधन झालेले नाही. त्यांच्या प्रकृतीती सुधारणा होतेय, अशी माहिती दिली आहे.

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या आल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. पण, या सर्व अफवा असल्याचे त्यांची लेक ईशा देओलने स्पष्ट केले आहे. धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिचे वडील बरे होत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पोस्टमुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच, ईशाने धर्मेंद्र यांच्या निधनाच्या सर्व अफवांचे खंडन केले आहे.

  • ईशाने इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हटलंय?

ईशा इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच, ईशाने लगेचच चुकीची माहिती दूर करण्यासाठी पोस्ट केली. तिने लिहिले आहे की की, “माझे वडील स्थिर आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करत आहे. माझ्या वडिलांसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद…”