बेळगाव / प्रतिनिधी

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात, बेळगाव शहर आणि तालुक्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत, गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरणात विसर्जन आठवड्यापासून गणरायाच्या करण्यास दुपारनंतर प्रारंभ स्वागताची तयारी करण्यात झाला होता. मागील भाविक गुंतले होते. बुधवारी जल्लोषात आगमन झालेल्या बाप्पांचे विधिवत पूजन आणि नैवेद्य आदी कार्यक्रम घरोघरी पार पडले. या कार्यक्रमानंतर लाडक्या बाप्पांना निरोप देण्याचा सोहळा देखील उत्साहाने पार पडला. मनामध्ये हुरहूर असूनही गणपती बाप्पांच्या विधिवत पूजनासाठी तसेच दीड दिवसांच्या विसर्जनासाठी भक्तांनी सार्वजनिक तलावांच्या ठिकाणी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.