बेळगाव / प्रतिनिधी

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगेरेच्या मंजुनाथने उत्कृष्ट सादरीकरण करत ‘मिस्टर कर्नाटक क्लासिक २०२६’ हा मानाचा किताब पटकावला. कडवी स्पर्धा, तगडे प्रतिस्पर्धी आणि रंगतदार पोझिंग यामध्ये मंजुनाथने सरस ठरत विजेतेपदावर नाव कोरले.

या स्पर्धेत प्रशांत खन्नूकर याने प्रथम उपविजेतेपद मिळवले, तर अमन शेख याने द्वितीय उपविजेतेपद पटकावले. उमेश गंगाणे याला आकर्षक सादरीकरणासाठी ‘बेस्ट पोझर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

वजनी गटानुसारही विजेत्यांची घोषणा करण्यात आली. ६० किलो गटात उमेश गंगाणे, ८० किलो गटात प्रशांत खन्नूकर, ८५ किलो गटात अमन शेख आणि ७५ किलो गटात इख्लास कुरेशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

याशिवाय ५५ किलो गटात कृष्णप्रसाद, ७० किलो गटात शरणू आणि ६५ किलो गटात इम्तियाज आनेर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदवून शरीरसौष्ठवाचा उत्कृष्ट नमुना सादर केला.