बेळगाव / प्रतिनिधी

सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असल्याने, त्याबाबत जनजागृती करणे व नागरिकांनी योग्य सावधगिरी बाळगावी यासाठी बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २८ मार्च रोजी जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील सामर्थ्य मंदिर सभागृहात (बालिका आदर्श विद्यालयाजवळ) सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आणि सायबर गुन्हा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्री मंतेरो मार्गदर्शन करतील.

सभेतील चर्चेत ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणूक, फिशिंग आणि अन्य ऑनलाईन दहशतवादापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती दिली जाईल. सभेच्या अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले.