बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. डॉ. विनोद व्हनाळकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सामूहिकरित्या भारतीय संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आले. संविधानात नमूद केलेल्या समानता, स्वातंत्र्य, न्याय या पालन करण्याची शपथ घेण्यात आली. संविधान संरक्षणासाठी उपस्थित सदस्यांनी शपथ घेतली. कार्यक्रम संयोजनासाठी संस्थेमधील कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.