• इंडियन बँकेच्या लॉकरमधील चोरी : एक अटकेत

बेळगाव / प्रतिनिधी

शहरातील भाग्यनगर सेकंड क्रॉस येथील इंडियन बँक शाखेच्या लॉकर मधील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आले असून त्यांनी एकाला अटक करून त्याच्याकडील १४ लाख रुपये किमतीचे एकूण १४३.९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव चंद्रकांत बालाजी जोर्ली (वय ३२) असे आहे.

त्याच्याकडून जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये २,४१,०५३ रुपयांची २४.८१ ग्रॅम वजनाची २४ कॅरेटची सोन्याची अंगठी, २,४७,८५५ किमतीची २५.५१ ग्रॅम वजनाची २४ कॅरेट सोन्याची अंगठी, २,३६,९७३ रुपये किमतीची २४.३९ ग्रॅम वजनाची २४ कॅरेट सोन्याची अंगठी, १,५४,५९४ रुपये किमतीचा १५.७३ ग्रॅम २२ कॅरेटच्या सोन्याचा नेकलेस, ४,६२,९१६ किमतीचे ४६.८९ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र आणि ५६, ६०९ रुपये किमतीची ५.७६ ग्रॅम वजनाची २२ कॅरेट सोन्याचे लॉकेट असलेली चेन अशा एकूण १४३.९ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा समावेश आहे. ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १४,००,००० रुपये इतकी होते.