चलवेनहट्टी : येथील ब्रम्हलिंग देवस्थानात रविवारी दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहाटे देवाची विधीवत पूजा करण्यात येईल. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनार्थ खुले करण्यात येणार आहे. रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उत्सवानिमित्त सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८ वाजल्यापासून महाप्रसादास प्रारंभ होईल. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवरात्र उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.