अथणी / वार्ताहर
अथणी जमखंडी मार्गावर तनिष्का बारजवळ झालेल्या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बाजूने चालत जाणाऱ्या मुलाला एका भरधाव कारने चिरडले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अगस्त्य कानमाडी (वय १०) रुद्देरट्टी (ता. अथणी) असे मुलाचे नाव आहे. अथणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चालक राहुल हुंडेकर याला अटक केली असून अथणी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अथणी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.