बेळगाव / प्रतिनिधी

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सारस्वत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच ते उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री कार्यालयात नवे पदभार स्वीकारणार आहेत. संघ लोकसेवा आयोगामार्फत त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संरक्षण मंत्रालयाकडे राजीनामा सादर केला होता. राजीनामा मंजूर होताच ते नव्या सेवेत रुजू होणार आहेत.

विशाल सारस्वत हे इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस (IDES) मध्ये कार्यरत असून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात त्यांची ही दुसरी बदली होती. अडीच महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी सीईओ म्हणून विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ पद रिक्त झाले आहे.