बेळगाव : मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासह पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी ५.०० वाजता जत्ती मठ देवस्थान बेळगांव येथे सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चातर्फे बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीस सर्व मराठा समाजातील बांधवांनी व मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा व मराठी मोर्चाचे सहसंयोजक प्रकाश आ. मरगाळे यांनी केले आहे.

