- माळमारुती पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात एका डॉक्टरच्या घरातून बेकायदेशीररीत्या साठवलेला गांजा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत १३४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. राहुल बंटी असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून, त्याने आपल्या घरातील बेडरूममध्ये गांजा लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे माळमारुती पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता हा गांजाचा साठा सापडला.
जबाबदार व्यवसायात असलेल्या व्यक्तीकडे अमली पदार्थ आढळल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर गांजा आरोपीने कोठून मिळवला, तसेच तो वैयक्तिक वापरासाठी होता की विक्रीसाठी, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.








