बेळगाव / प्रतिनिधी

१७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सीमाभागातील मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात पुढील लढ्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार, १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत १७ जानेवारी हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन, सद्यस्थितीतील मराठी भाषेवरील अन्याय आणि सीमालढ्या संदर्भातील कार्यकर्त्यांचे विचार ऐकणे, तसेच पुढील रणनीती ठरवणे यावर चर्चा होणार आहे.

बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण समिती सदस्य, युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समिती अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अँड एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, विठ्ठल पाटील, मोनापा पाटील व लक्ष्मण होनगेकर यांनी केले आहे.