• मंत्री बी. एस. सुरेश यांची माहिती

बेंगळुरू : बेळगाव महानगरपालिकेला विविध विकास कामांसाठी १७० कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री बी. एस. सुरेश यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे.
प्रश्नोत्तराच्या काळात आमदार साबण्णा तळवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, बेळगाव शहरातील बसवण कुडची येथील देवराज अर्स के. एच. पी. वसाहतीत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे‌.या भागात रस्ते भूमिगत गटार युजडी वीज जोडणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १५ कोटींचा अंदाजपत्रक प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून हा निधी स्वतंत्र स्वरूपाचा आहे.