बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मंगळवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. बालमुकुंद पत्की यांना ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पत्रकार भवन, पद्मावती चेंबर्स, कुलकर्णी गल्ली, बेळगाव येथे होणार आहे.

या सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक संघ, बेळगावचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ दिलेल्या योगदानाबद्दल श्री. पत्की यांचा सत्कार करण्यात येणार असून, कार्यक्रमास पत्रकार, मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्ष सुहास हुद्दार, कार्यवाह महेश काशीद यांनी केले आहे.