बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावचा प्रतिभावान क्रीडापटू व स्केटिंगपटू शुभम साखे याने कोल्हापूर येथे झालेल्या प्रतिष्ठित बर्गमन ट्रायथलॉन स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

ही ट्रायथलॉन स्पर्धा पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तीन कठीण टप्प्यांची असून ती सहनशक्ती व कौशल्याची कसोटी मानली जाते. स्पर्धेत देशभरातील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र शुभम याने तिन्ही विभागांत सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत स्पर्धेत वर्चस्व राखले.

कठोर सराव, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर शुभम याने ‘बर्गमन’ हा मानाचा पुरस्कार मिळवून बेळगावच्या क्रीडाक्षेत्रात मान उंचावला आहे. त्याचा हा विजय केवळ वैयक्तिक यश नसून, ट्रायथलॉनसारख्या खडतर क्रीडा प्रकाराकडे वळणाऱ्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरत आहे.