बेळगाव / प्रतिनिधी

‘बेळगावचा राजा’ श्री गणेशाला भक्तांकडून कडून १५ किलो चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. सद्‌भावनेनी हा चांदीचा मुकूट बेळगावचा राजाच्या चरणी अर्पण केलेला आहे. हा सोहळा गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा श्री. चव्हाटा मंदीर चव्हाट गल्ली बेळगाव येथून मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद व्दिगुणित करावा तसेच श्री चव्हाटा मंदीर ते श्री मारुती देवालयापर्यंत मिरवणूक निघणार आहे, तिथे अभिषेक घालण्यात येणार आहे. तरी याची नोंद समस्त गणेश भक्तनि घ्यावी असे आवाहन बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार व कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांनी केले आहे.