बेळगाव / प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे चव्हाट गल्ली बेळगाव येथे बेळगावचा राजा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. उसत्व दरम्यान येणाऱ्या अडचणी संदर्भात नुकतेच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन देण्यात आले
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी निवेदन स्वीकारून गणेशोत्सव बाबतीत पोलीस निरीक्षक यांच्या सुचनेनुसार कायद्यचे पालन करून आनंदाने उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात यावा. तसेच गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. वैभवशाली गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याच्या वेळेवरून निर्माण झालेला वाद सामोपचाराने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोडवला जावा. उत्सवादरम्यान संवेदनशील भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भर देण्यात यावा. तसेच जकिंहोंडा तालावर येणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षना हार घालून मि स्वतः स्वागत करेन.तसेच मंडप लाईट, सजावट देखावा करतांना कुठल्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावल्या जातील असं बॅनर वर अनुचित प्रकार सादर करू नये तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित करावे पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करावा अशाप्रकारे अनेक सुचना चव्हाट गल्लीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बेळगावचा राजाच्या मंडळाचे कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांनी आगमन व विसर्जन सोहळा संदर्भातील येणाऱ्या अडचणी व संवेदनशील भागातील विविध उद्भभवणाऱ्यावर समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मंडळ प्रयत्न करत असतात तसेच कायदा सुव्यवस्थाला कुठेही गालबोट लागणार नाही, तसेच आम्ही जाणूनबुजून विसर्जन मिरवणुकीला उशीर करत नाही कारण चव्हाट गल्ली इतकी मोठी आहे की गल्लीत आठ हजार हुन अधिक जनसमुदाय आहेत प्रत्येक घरासमोर जल्लोषात स्वागत होत असतो. या कारणांमुळे आम्हाला गलल्लीतच पहाट होतेय. तरी आम्ही यावर्षी लवकरात मिरवणूकित यायचा प्रयत्न करीन.असे पोलीस आयुक्तांना सांगितले.
यानंतर विनायक पवार यांनी गल्लीतील युवकांच्या एकजुटीमुळे गणेशोत्सव शांततेत पार पडतो गणेशोत्सव काळात दररोज मोठ्या संख्येने बेळगावचा राजाच्या दर्शनासाठी भक्त येत असतात तसेच आम्ही पंधराशे विद्यार्थ्यांना वह्या पेन तसेच शाळेचे साहित्य व प्रसाद देत असतो महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असते तसेच महिलांची छेडछाडीच्या प्रकार आमच्या परिसरात होऊ देत नाही पण संवेदनशील भागातून आमच्या महिला येतं असते वेळी त्या भागात महिला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा असे सांगितले
यावेळी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, रोहन जाधव, निशा कुडे सौरभ पवार, हर्षल नाईक गौतम पाटील, उमेश मेणसे अनंत हांगीरगेकर हरीश ताशीलदार,यासह अन्य उपस्थित होते.