बेळगाव : बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चव्हाट गल्ली बेळगाव येथील श्री मूर्तीच्या मंडपाचे मंत्र घोषात रविवारी मोठ्या उत्साहात विधिपूर्वक शुद्धीकरण पूजन करण्याबरोबरच होमअवहन आदी पूजा पाठ करण्यात आले. याप्रसंगी रांगोळी फुलांची आरस त्याचबरोबर मंगल फळेफुले पाने आदी योजनेने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मंगलयता निर्माण झाली होती.
याप्रसंगी पुरोहित विठ्ठल यांनी यथासांग मंडळाचे कार्याध्यक्ष सुनिल जाधव व उपाध्यक्ष सौरभ पवार यांच्याकडून विधीपूर्वक पूजन करून घेतली. त्याचबरोबर मंडपाचे शुद्धीकरणही केले होमअवहना आधी उपचारामुळे यंदाच्या सोहळ्यात गांभीर्य आणि भक्तीभावाच्या अंतर्भाव निर्माण झाला. यावेळी अनेक गल्लीतील नागरीकांनी व महिलांनी व युवकांनी याप्रसंगी भक्तीभावाने पूजेत सहभाग घेतला.
यावेळी प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, सुधीर धामनेकर अभिषेक नाईक सत्यम नाईक वृषभ मोहिते विनायक पवार भरत काळगे, विशाल मुचंडी, अनंत बामणे, सौरभ पवार, हर्षल नाईक, महिंद्र पवार, निखील पाटील, रोहन जाधव, संदीप कामुले, राहुल जाधव, संजय रेडेकर, विशाल मूचंडी उमेश मेणसे यासह अन्य उपस्थित होते.