बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्याबाबत चर्चा होणार आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.