बेळगाव / प्रतिनिधी

‘स्कूल गेम्स २०२५’ अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. कर्नाटकभरातून ३०० हून अधिक स्केटर्स सहभागी झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे निवड झालेल्या खेळाडूंनी एकूण ३ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदके पटकावली.

पदक विजेते खेळाडू : जान्हवी तेंडुलकर – २ सुवर्ण , आराध्या पी. – १ सुवर्ण, १ रौप्य , रश्मिता अंबिगा – २ रौप्य, १ कांस्य, शल्या तरळेकर – १ रौप्य, १ कांस्य, ऋत्विक दुबाशी – १ रौप्य, अवनीश कामन्नावर – १ रौप्य, १ कांस्य, करुणा वाघेला – १ कांस्य

या खेळाडूंना केएलई संस्था व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगाणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ यळ्ळूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी यांच्यासह अनेक मान्यवरांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.