- काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या फलंदाजीने वेधले लक्ष
बेळगाव / प्रतिनिधी
पत्रकार दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून बेळगाव इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याहस्ते करण्यात आले.
गुरुवारी, बेळगाव येथील जिल्हा पोलीस मैदानावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्याहस्ते जिल्हाधिकारी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघांमधील सामन्याचे उद्घाटन झाले. या दरम्यान काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनीही फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पहिला सामना डीसी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ यांच्यात झाला, तर दुसरा सामना एसपी ११ आणि वन विभाग संघ यांच्यात झाला. या दोन दिवसांच्या स्पर्धेत पोलिस आयुक्त संघ, व्हीटीयू संघ, बिम्स संघ, महापालिका संघ, पशुसंवर्धन विभाग संघ, प्रिंट मीडिया संघ, जी.पी. संघ, उत्पादन शुल्क विभाग संघ, जिल्हा आरोग्य विभाग संघ, अन्न विभाग संघ, केएसआरटीसंघ, डीसी डब्ल्यू संघ, चिक्कोडी मीडिया संघ आणि इतर संघ सहभागी होतील. आयोजकांनी सर्वांना २ दिवसांच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.