• रामराजन यांची नूतन पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची पदोन्नती देत त्यांची बंगळुरू येथील सीआयडी विभागात पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी रामराजन यांची बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, याबाबत राज्य सरकारने अधिकृत आदेश जारी केले आहेत.

रामराजन यांनी यापूर्वी कोडगू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. बेळगाव हा भौगोलिकदृष्ट्या मोठा व संवेदनशील जिल्हा असल्याने, येथे कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असेल.

नूतन पोलीस अधीक्षक रामराजन लवकरच बेळगावमध्ये पदभार स्वीकारणार असून, त्यांच्या कार्यकाळात जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.