• राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ; प्रशिक्षकांचे योगदान मोलाचे

बेळगाव / प्रतिनिधी

बेंगळुरू येथे झालेल्या राज्यस्तरीय पोलिस कर्तव्य स्पर्धा 2025 मध्ये बेळगाव जिल्हा पोलिस दलातील ‘अदिती’ या श्वानाने आपली क्षमता दाखवत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली आहे. मादक पदार्थ शोध पथक या विभागातील तिच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर अदितीची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.

अदितीला मादक पदार्थ शोधण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले असून, तिच्या यशामागे पथकातील कर्मचारी महेश घट्नट्टी आणि यल्लेश नायक यांचे समर्पित मार्गदर्शन व परिश्रम महत्वाचे ठरले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली अदितीने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी सादर करत राज्यात बेळगाव पोलिस दलाचे नाव उज्ज्वल केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल अदिती आणि तिच्या प्रशिक्षक पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय स्तरावरही ती आपला दबदबा कायम राखेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.