बेळगाव / प्रतिनिधी
आधार शिक्षण संस्था संचालित बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये फन विक साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिनय स्पर्धा, अंताक्षरी, नेल पेंटिंग, रॅम्प वॉक,संगीत खुर्ची अशा मजेदार स्पर्धांचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम संयोजनासाठी प्रा. उदय पाटील, दीपक हरदगट्टी यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीतम पाटील, श्रद्धा पाटील, डॉ. तेजश्री पुजेरी, डॉ. चंदन पंडित, सुशांत पवार यांनी परिश्रम घेतले.








